इस्त्रायलने थाळ्या किंवा टाळ्या पिटून कोरोना पळवणे या नवटांक उद्योगांना थारा दिला नाह

 

इस्त्रायलने थाळ्या किंवा टाळ्या पिटून कोरोना पळवणे या नवटांक उद्योगांना थारा दिला नाह




शिवसेनेने केंद्रातील भाजपा सरकारला फटकारले


मुंबई: इस्त्रायलने कोरोनावर मिळवलेल्या विजयाकडे बोट दाखवत शिवसेनेने पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र  मोदींना चिमटे काढले आहेत.  मोदी ज्या पद्धतीने कोरोना लढ्याचे नेतृत्व करत होते ते पाहता इस्त्रायलच्या आधी आपला भारतच जगात कोरोनामुक्त होईल असे वातावरण अंधभक्तांनी निर्माण केलेच होते, असे म्हणत शिवसेनेने भाजपा कार्यकर्त्यांसह समर्थकांचे कान टोचले आहेत. इस्त्रायलने फालतू राजकारण, थाळ्या किंवा टाळ्या पिटून कोरोना पळवणे या नवटांक उद्योगांना थारा दिला नाही अशा शब्दात शिवसेनेने फटकारले आहे.


प्रधानमंत्री मोदी व गृहमंत्री शहा हे पश्‍चिम बंगालच्या निवडणूक प्रचार मोहिमेतून दिल्लीस परतले आहेत. दिल्लीत येताच दोघांनीही कोरोनासंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष घालण्यास सुरुवात केली. प्रधानमंत्री मोदी यांनी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक बोलावून कोरोनाच्या गांभीर्याबाबत चर्चा केली, तर शहा यांनी स्पष्ट केले की, घाईघाईने लॉकडाउन लावण्याची गरज नाही. 


मोदी यांना एव्हाना एक आनंदाची बातमी समजली असेलच. इस्त्रायल या देशाने कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तीची घोषणा करणारा इस्त्रायल हा जगातील पहिला देश ठरला आहे. मोदी ज्या पद्धतीने कोरोना लढ्याचे नेतृत्व करत होते ते पाहता इस्त्रायलच्या आधी आपला भारतच जगात करोनामुक्त होईल असे वातावरण अंधभक्तांनी निर्माण केलेच होते. पण करोनामुक्ती सोडाच, देशात करोनाने घातलेलं थैमान हाताबाहेर गेलं. इस्त्रायलने देश करोनामुक्त होण्यासाठी काय केले? त्यांनी संपूर्ण लसीकरण तर केलेच, पण नियम आणि निर्बंधांचे काटेकोर पालन केले. फालतू राजकारण, थाळ्या किंवा टाळ्या पिटून कोरोना पळवणे या नवटांक उद्योगांना थारा दिला नाही अशा शब्दात शिवसेनेने फटकारले आहे.